हल्ली लिहायला काही जमत नाही. म्हणजे हल्ली काही लिहिलं जात नाही. मी क्षणभर विचार करतो. का? का होतंय असं? म्हणजे लिहिण्यासारखं काही सुचत नाही की लिहिण्यासारखं काही दिसत नाही की लिहिण्यासारखं काही ऐकू येत नाही की लिहिण्यासारखं काही घडतच नाही. नक्की काय होतंय?
खरंतर बरंच काही घडतंय पण मनापर्यंत काही पोचत नाहीय. मन खडबडून जागे होत नाहीय. बरंच काही दिसतंय पण मेंदूपर्यंत पोचत नाहीये. बरंच काही कानावर पडतंय पण हृदयापर्यंत पोचत नाहीय. कारण? कारण मी मनाची, मेंदूची आणि हृदयाची कवाडं बंद करून घेतली आहेत.
अजून विचार करायला लागलो की का केली आहेत मी माझ्या मनाची कवाडं बंद? कारण सुद्धा काही काळात नाहीय. पण याचं उत्तर मिळवायलाच हवं. नक्की मिळवायलाच हवं.

No comments:
Post a Comment